भाविकांना दिलासा! पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे कायमस्वरूपी धावणार, चार राज्यांतील भाविकांना होणार फायदा, कसे असतील प्रमुख थांबे अन्‌ मार्ग..

Pandharpur Tirupati weekly special train now permanent service: पंढरपूर-तिरुपती विशेष गाडीला नियमित मान्यता; चार राज्यांतील विठ्ठल व बालाजी भक्तांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, २४ डब्यांची सुविधा व २६ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा
New Rail Boost for Pilgrims: Pandharpur–Tirupati Weekly Train Now Permanent

New Rail Boost for Pilgrims: Pandharpur–Tirupati Weekly Train Now Permanent

sakal

Updated on

सोलापूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या आणि तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी भारतीय रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने पंढरपूर - तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे आता कायमस्वरूपी (नियमित) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांतील भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे, हे निश्‍चित.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com