esakal | रशियाची "स्पुटनिक' सोलापुरात ! 82 जणांनी टोचला पहिला डोस
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

रशियाची "स्पुटनिक' सोलापुरात ! 82 जणांनी टोचला पहिला डोस

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाला प्रतिबंध करणारी रशियाने बनवलेली स्पुटनिक लस अखेर सोलापुकरांसाठी उपलब्ध झाली आहे. ही लस खासगी केंद्रांमध्ये दिली जाणार असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीनुसार 1145 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रारंभी बार्शीतील अंधारे हॉस्पिटलमधून स्पुटनिक लस मर्यादित लोकांनाच दिली जाणार आहे.

जिल्ह्यासाठी जानेवारीपासून आतापर्यंत कोविशिल्डचे 14 लाख 53 हजार 946 डोस तर 75 हजार 105 डोस कोवॅक्‍सिनचे आले आहेत. ग्रामीणमधील सात लाख 16 हजार 862 व्यक्‍तींनी पहिला, तर पावणेतीन लाख व्यक्‍तींनी दुसरा डोस घेतला आहे.

शहरातील तीन लाख 19 हजार 516 व्यक्‍तींनी पहिला तर त्यातील एक लाख 29 हजार 189 जणांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. त्यामध्ये बहुतेक व्यक्‍तींनी कोविशिल्ड लसीचेच दोन्ही डोस घेतले असून काहींनी कोवॅक्‍सिन लस घेतली आहे.

दरम्यान, दोन दिवसांत रशियाची स्पुटनिक लस बार्शी तालुक्‍यातील 82 जणांनी टोचून घेतली आहे. आता त्यांना 21 दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल, अशी माहिती लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी दिली. स्पुटनिक लस 18 वर्षांवरील कोणताही व्यक्‍ती घेऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: कुरनूर धरणातून 1800 क्‍युसेकचा विसर्ग ! गावांना सतर्कतेचा इशारा

लसीसंबंधी ठळक बाबी

  1. स्पुटनिक लस कोरोनाविरूध्द 91 टक्‍के प्रभावी

  2. स्पुटनिकचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दिला जातो दुसरा डोस

  3. बार्शीतील अंधारे हॉस्पिटलमध्ये एक हजार डोस; 82 जणांनी टोचली ती लस

  4. एका डोसची किंमत 1145 रुपये; दोन्ही डोससाठी मोजावे लागतात 2290 रुपये

  5. एक डोस स्वतंत्र ऍम्प्युलमध्ये येतो; मायनस 20 डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवावी लागते लस

हेही वाचा: कोरोनामुळे 28 हजार मुले अनाथ! शासन मदत नाहीच; अनाथ बनले बालमजूर

खासगी केंद्रांना स्पुटनिकची परवानगी

देशातील लसीकरण मोहिमेअंतर्गत रशियाच्या स्पुटनिक लसीला परवानगी मिळाली आहे. मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये ही लस खासगी केंद्रांवरून पैसे घेऊन दिली जात आहे. उस्मानाबाद, लातूर, बीडसह शेजारील अन्य जिल्ह्यांमध्ये ही लस अजूनपर्यंत आलेली नाही. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील अंधारे हॉस्पिटलमध्ये ती उपलब्ध झाली आहे. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी कंपनीकडून त्यांना ही लस मिळाली असून काही महिन्यांपूर्वी हॉस्पिटलने तसा पत्रव्यवहार केला होता. अंधारे हॉस्पिटलला जानेवारीत लसीकरण केंद्राची परवानगी मिळाली होती.

loading image
go to top