
Pangari reels under heavy rainfall; crops destroyed and 20,000 poultry dead.
Sakal
पांगरी : गेल्या २० ते २५ दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने काल (ता. १३) दुपारी सव्वा चारच्या सुमारास जोरदार एन्ट्री करत अवघ्या आठ तासांत तब्बल ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे परिसरातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले, तर शेतांमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप दिसू लागले.