मोहोळ - मोहोळ तालुक्यातील कोळेगाव, यावली, पेनुर, टाकळी सिकंदर, यासह अन्य गावातील डोंबारी समाज, भटके विमुक्त, बहुरूपी यांना स्मशान भूमीसाठी जागा द्यावी, पंतप्रधान आवास योजनेचा सर्वेचे ऑफलाइन अर्ज स्वीकारावेत यासह अन्य मागण्यासाठी सोमवार ता. 21 रोजी तहसील कार्यालयासमोर भाजपचे सोशल मीडिया प्रमुख संजीव खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुटी आंदोलन करण्यात आले.