
सोलापूर: पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली जाइल. नाराजांचे मत समूजन घेतले असून प्रमुख सहकाऱ्यांनी मांडलेल्या बाबींची नोंद घेतली आहे. याबाबत पक्षाध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून प्रदेश पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांच्या नियुक्तीबाबत नाराजी असल्याच्या प्रश्नावरही ते बोलले. त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मी आलो नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.