esakal | ई-पिक पाहणीचा भार आता पोलीस पाटीलकडे । EPIK
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पीक नोंदणी

ई-पिक पाहणीचा भार आता पोलीस पाटील कडे

sakal_logo
By
राजकूमार शहा

मोहोळ : शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याचा भार आता पोलीस पाटील, रेशन दुकानदार यांच्यासह अन्य यंत्रणा वर टाकण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यात एकूण 94 हजार खातेदार असून मंगळवार पर्यंत 32 हजार 800 शेतकऱ्यांनी हे अॅप डाऊनलोड केले असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. दरम्यान हे अॅप डाऊनलोड करण्याची मुदत गुरुवार ता 30 सप्टेंबर पर्यंत असल्याने मोठी अडचण होत आहे.

हेही वाचा: पती-पत्नीची आत्महत्या; गळफास घेण्याआधी ३ मुलांना पाजलं विष

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गावकामगार तलाठी हे त्यांच्या नेमणुकीच्या गावातील कार्यालयात बसूनच शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष न जाता पिक पाहणी करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत शासनाने ई-पीक पाहणी हे अॅप विकसित केले आहे, ते प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकाचा फोटो काढून तो अपलोड करावयाचा आहे. त्यामुळे तक्रारीचा निपटारा होणार आहे.

हेही वाचा: मोदी भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा संबंध तोडत आहेत - राहुल गांधी

मोहोळ तालुक्यातील खातेदारांचे काम पूर्ण करण्यासाठी तहसीलदार बेडसे यांनी रेशन दुकानदार, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर, महा ई सेवा केंद्र यांना उद्दिष्ट देऊन ही यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे लवकरच उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. दरम्यान आपण किती शेतकऱ्यांचे काम केले याचा अहवाल दररोज तहसीलदारांना द्यावयाचा आहे. त्यासाठी त्यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे.

यामुळे नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणे व अन्य कामे करणे भविष्यात सोपी होणार असून, शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.शासनाचा महसूल ही वाढणार आहे. अनेक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यासाठी ई पीक पाहणी नोंदणीची मुदत वाढविणे गरजेचे आहे.

मोहोळ तालुक्यातील पिक पाहणीत सहभाग असलेल्या यंत्रणा पुढील प्रमाणे

रेशन दुकानदार - 118,

पोलीस पाटील - 60

कोतवाल - 45

महाईसेवा केंद्र -30

ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर -63

यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे अवाहन महसुल प्रशासनाने केले आहे.

loading image
go to top