
वैराग : बार्शी-लातूर रस्त्यावर कुसळंब येथे पती-पत्नी मजुरी करून घराकडे चालत जात असताना मागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने पतीला धडक दिली. यात पतीचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (ता.२५) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. या प्रकरणी बार्शी तालुका पोलिसांत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.