Sangola: 'साहेब, तेवढी सही करा ओ..! घरकुल वाटपात होत आहे दिरंगाई; नागरिकांचे हाल

बक्षीसपत्र जागेच्या फाईलवर प्रांताधिकार्‍यांची सहीच होत नसल्याने लाभार्थ्यांची नाराजी
Sangola: 'साहेब, तेवढी सही करा ओ..! घरकुल वाटपात होत आहे दिरंगाई; नागरिकांचे हाल

Sangola: 'साहेब, तेवढी सही करा ओ.. घरकुल बांधायचं तटलयं!' भूमिहीनांना घरकुल बांधण्यासाठी बक्षीसपत्र दिलेल्या जागेच्या फाईलवर प्रांताधिकारी यांची सहीच होत नसल्याने सामान्य भूमिहीन वैतागून सही करण्याची आर्त हाक देत आहेत. एकीकडे सरकार 'शासन आपल्या दारी' योजना राबवत असून दुसरीकडे सामान्यजन कामांसाठी अधिकाऱ्यांच्या दालनाचे हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याचे प्रकार घडत आहेत.

Sangola: 'साहेब, तेवढी सही करा ओ..! घरकुल वाटपात होत आहे दिरंगाई; नागरिकांचे हाल
Sangola News : सांगोल्यातील समस्यांसाठी शेकाप पक्षाने दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

गोरगरिबांना राहण्यासाठी घर असावे त्यासाठी शासन विविध योजनांद्वारे घरकुले मंजूर करीत असतात. घरकुल मंजूर असूनही जमीन जागा नसल्यामुळे घर बांधणे मुश्किल होते. अशा लाभार्थ्यांना त्यांचे घरकुलासाठी जागा दुसऱ्याकडून बक्षीसपत्र करून घ्यावी लागते. यासाठी प्रांताधिकार्‍यांची परवानगी हवी असते. जागेसाठी पै-पाहुण्यांना, शिजापाजाऱ्यांना जागेच्या बक्षीस पत्र करण्यासाठी गयावया करावी लागते.

ती बक्षीसपत्र करून घेतल्यानंतर गेली दोन-तीन महिने होऊनही या बक्षीस पत्र फायलींवर प्रांताधिकाऱ्यांची सही होत नसल्याने लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यास सुरुवात करता येत नाही. एकीकडे घरकुल बांधण्यास सुरुवात न केल्यामुळे ग्रामसेवक घरकुल लवकर बांधा किंवा बांधत नाही म्हणून लिहून द्या असे वारंवार सूचना देत आहेत तर दुसरीकडे बक्षीस पत्रावर मंजुरीसाठी सही होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या कचाट्यातच सामान्य भरडला जात आहे.

Sangola: 'साहेब, तेवढी सही करा ओ..! घरकुल वाटपात होत आहे दिरंगाई; नागरिकांचे हाल
Sangola Water Supply : सांगोला शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया

अधिकाऱ्यांसह कापला केक, चर्चा मात्र अनेक - प्रांताधिकारी यांना सामान्यांच्या कामासाठी वेळ मिळत नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ असल्याचे दिसून येत आहे. सांगोल्यात आटपाडी तालुक्यातील एका गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीबरोबर सांगोला-मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी व त्यांचे सहकारी केक कापून वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या वाढदिवस प्रकरणामुळे महसूलमधील अधिकाऱ्यांची चर्चा मात्र गेली काही दिवस सांगोल्यात जोरदार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी कोणाचेही वाढदिवस साजरे करावे. परंतु सामान्यांची कामे मात्र वेळेवर करावी अशी चर्चा धबक्या आवाजात सुरु आहे. वैयक्तिक जीवनामध्ये कोणी, कधी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु लोकशाही प्रदान संस्कृतीमध्ये अधिकाऱ्यांनी काही तारतम्यता बाळगावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Sangola: 'साहेब, तेवढी सही करा ओ..! घरकुल वाटपात होत आहे दिरंगाई; नागरिकांचे हाल
Sangola News : सांगोला भुयारी गटारी योजनेच्या कामाला ९६ कोटी ६३ लाख मंजूर

प्रांताधिकाऱ्यांकडून बोलण्यास टाळाटाळ -

प्रांताधिकारी आर. बी. माळी यांना वाढदिवसाच्या प्रकरणाविषयी विचारले असता 'मी पाहून सांगतो' एवढेच उत्तर दिले परंतु त्यानंतर त्यांनी याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली. जागेच्या बक्षीस पात्र फायदेंविषयी विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयी बोलणे टाळले.

तहसीलदारांसमोर मांडले गार्‍हाणे -

बक्षीसपत्र फाईलवर सही होत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांने थेट तहसीलदारसमोरच आपले गार्‍हाणे मांडले. 'आम्ही सांगोल्याहून मंगळवेढ्याला अनेक वेळा गेलो, तेथेही अध्याप साहेबांची सही होत नसल्याचे सांगितले जात होते. साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या समोरील चिठ्ठीही काढली परंतु साहेबांनी भेट दिली नाही. आता आम्ही कोणाकडे जायाचे.' याबाबत सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी लक्ष देऊन काम करुन घेतो असे सांगितले.Sangola

Sangola: 'साहेब, तेवढी सही करा ओ..! घरकुल वाटपात होत आहे दिरंगाई; नागरिकांचे हाल
Sangola News : पाण्यासाठी आजी-माजी आमदार आक्रमक; कालवा सल्लागार समिती बैठकीत विचारणा, हक्काच्या पाण्याची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com