
सोलापूर: विदेशी मद्य विक्रीकर व एक्साईज ड्युटीमध्ये ६० ते ७० टक्के वाढ झाल्याने दरात वाढ झाली आहे. तसेच परमीट रूमचा विक्रीकर पूर्वी ५ टक्के होता. आता तो १० टक्के झाला आहे. याचाही फटका परमीट रूमचालकांना बसत आहे, या दरवाढीविरोधात सोलापूर जिल्हा बार आणि परमीट रूम असोसिएशनच्यावतीने सोमवारी हॉटेल कडकडीत बंद ठेवून शासनाचा निषेध केला. या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती, असोसिएशनचे अध्यक्ष संजीव इंदापुरे यांनी दिली आहे.