
सोलापूर : उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाजवळील पत्रकार नगरातील महिला वकील पद्मजा रणजित बनहट्टी यांच्या भाड्याच्या घरातून सहा लाख ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या चोरीची उकल केली आहे. शुभम सीताराम कजाकवले (वय १९, रा. लष्कर, उत्तर सदर बझार) असे त्या संशयिताचे नाव आहे.