Vegetable Vendor Dies in Solapur : टमटमला पिकअपची धडक; भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू, टेंभुर्णी मार्केटला जाताना अपघात
Tam Tam and Pickup Accident Tembhurni : पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिकंदर तांबोळी हे टमटममधून टेंभुर्णीतील मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी निघाले होते. सोलापूर- पुणे महामार्गावरील वेणेगावनजिक आले असता मागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने टमटमला जोरदार धडक दिली.
Scene of the tragic collision between a pickup and tumtum en route to Tembhurni market; vendor dies on the spot.Sakal
टेंभुर्णी : टेंभुर्णीतील मार्केटमधून भाजीपाला खरेदी करण्यासाठी टमटममधून येत असताना मागून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने टमटम उलटला. यात मोडनिंब येथील भाजीपाला विक्रेता गंभीर जखमी होऊन ठार झाला.