
सोलापूर जिल्ह्यात गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे फिल्मी स्टाईलने अपहरण करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही कारवाई केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेतील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे.