

Assembly Session Police Alert Strict Orders to Police Inspectors Against Illegal Businesses and Traffic Violations in the City
sakal
सोलापूर : शहरातील सातही पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) त्यांच्या हद्दीतील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद झाल्यावरच घरी जावे. जास्तीत जास्त वेळ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात थांबावे, असे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी आज (बुधवारी) दिले. अधिवेशन काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यादृष्टीने सर्वांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना दिल्या.