

Police Constable Amrit Khedkar after completing his remarkable 4,250 km cycle rally in just 15 days.
Sakal
बार्शी : फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कश्मीर ते कन्याकुमारी ४ हजार २५० किलोमीटर अंतराची भव्य सायकल रॅली १ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये बार्शीचे सुपुत्र तथा सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अमृत खेडकर यांनी सहभाग घेऊन यशस्वी झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.