

“21 ‘Surprise Nakabandi’ points set up in Solapur; police tighten night security to curb thefts and robberies.”
Sakal
सोलापूर: विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत १५ दिवसांत दोन गुन्हे घडले. रात्रीच्या वेळी आयटी इंजिनिअरला अडवून लुटणे आणि एका ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला. यापूर्वी वसंत विहार परिसरात अशीच घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी तीन ठिकाणी अचानक नाकाबंदी लावण्याचा निर्णय सोमवारी (ता. ३) झाला. त्यावेळी वाहतूक पोलिसही असणार आहेत.