घरगुती गॅसचा वापर वाहनांसाठी! 27 गॅस टाक्‍या अन्‌ सात रिक्षा जप्त

घरगुती गॅसचा वापर वाहनांसाठी! 27 गॅस टाक्‍या अन्‌ सात रिक्षा जप्त
घरगुती गॅसचा वापर वाहनांसाठी! 27 गॅस टाक्‍या अन्‌ सात रिक्षा जप्त
घरगुती गॅसचा वापर वाहनांसाठी! 27 गॅस टाक्‍या अन्‌ सात रिक्षा जप्त
Updated on
Summary

गुपचूप पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनांच्या इंधनासाठी वापरण्याचे प्रकार वाढले आहेत.

सोलापूर : पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर वाढल्याने सर्रास रिक्षांमध्ये इंधन म्हणून गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. गुपचूप पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस (LPG) वाहनांच्या इंधनासाठी वापरण्याचे प्रकार वाढले आहेत. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (City Crime Branch Police) प्रभाकर महाराज मठाजवळील जवळकर वस्ती परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमधून 17 गॅस सिलिंडरच्या टाक्‍या आणि सात रिक्षा जप्त केल्या आहेत.

घरगुती गॅसचा वापर वाहनांसाठी! 27 गॅस टाक्‍या अन्‌ सात रिक्षा जप्त
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!

शहर गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदाराकडून घरगुती गॅस सिलिंडरचा वापर रिक्षात इंधन म्हणून होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी भरलेल्या 17 गॅस टाक्‍या, त्याठिकाणी उभ्या असलेल्या सात रिक्षा, दोन वजन काटे व इलेक्‍ट्रिक मोटारीसह तब्बल आठ लाख 41 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिवाळीच्या सणात घरगुती गॅसचा तुटवडा जाणवल्याने पोलिसांनी अशा अवैध व्यवसायांवर फोकस केला.

या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यात संगरत्न निजलिंगप्पा इंगळे (रा. बुधवार पेठ, मिलिंद नगर) व महेश बाबासाहेब कांबळे (रा. प्रभाकर महाराज मठाजवळ), लक्ष्मण श्रीमंत पवार, निलेश भाऊराव गायकवाड, संदीप पांडुरंग तुळसे, नितीन नागनाथ क्षीरसागर, तुळशीराम बनसिद्ध चवरे, अमोल देविदास घुले या रिक्षा चालकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दिवाळीत घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण करणे, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर करणे, या गुन्ह्याखाली त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदिप शिंदे, अजय पाडवी, तात्यासाहेब पाटील, अजिंक्‍य माने, कुमार शेळके, गणेश शिंदे, राजकुमार पवार, निलोफर तांबोळी, संजय काकडे यांच्या पथकाने केली.

घरगुती गॅसचा वापर वाहनांसाठी! 27 गॅस टाक्‍या अन्‌ सात रिक्षा जप्त
भाजपची पंचाईत! सोलापूर विधान परिषदेची मार्चनंतर निवडणूक

स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती का?

जुगार, मटका, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री या गुन्ह्याखाली अनेकांविरुध्द गुन्हे दाखल केले जातात. स्थानिक गुन्हे शाखेकडून अशा बऱ्याच कारवाया झाल्या आहेत. दरम्यान, प्रभाकर महाराज मठाजवळ हा अवैध व्यवसाय सुरू होता. त्या ठिकाणी बऱ्याच रिक्षात इंधन म्हणून घरगुती गॅस भरला जात होता. तरीही, स्थानिक पोलिसांना त्याची माहिती कशी झाली नाही, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com