भाजपची पंचाईत! सोलापूर विधान परिषदेची मार्चनंतर निवडणूक

भाजपची पंचाईत! सोलापूर विधान परिषदेची मार्चनंतर निवडणूक
भाजपची पंचाईत! सोलापूर विधान परिषदेची मार्चनंतर निवडणूक
भाजपची पंचाईत! सोलापूर विधान परिषदेची मार्चनंतर निवडणूकSakal
Summary

नगर व सोलापूर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे; कारण...

सोलापूर : राज्यातील मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), धुळे (Dhule) - नंदुरबार (Nandurbar), अकोला (Akola) - बुलढाणा (Buldhana) - वाशीम (Washim), नागपूर (Nagpur) या विधान परिषदेच्या जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. मात्र, नगर (Nagar) व सोलापूर (Solapur) विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. या दोन्ही मतदारसंघांतील मतदारांची एकूण संख्या 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. नव्याने झालेल्या पाच नगरपंचायती व मोहोळ, माढा, माळशिरस या नगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाल्यावर मार्चनंतर विधान परिषदेची निवडणूक होईल, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

भाजपची पंचाईत! सोलापूर विधान परिषदेची मार्चनंतर निवडणूक
'PSI'ची वाढणार वयोमर्यादा? बुधवारी होणार कॅबिनेटमध्ये निर्णय

सोलापूर विधान परिषदेसाठी 16 नगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायतींसह जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांचे सभापती मतदान करणार आहेत. एकूण मतदारांची संख्या 492 असून सध्या मोहोळ, माळशिरस, माढा या नगर परिषदांची मुदत संपली असून, तेथील सदस्यांचा कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे. दुसरीकडे, वैराग, अनगर, श्रीपूर-महाळुंग, वेळापूर, नातेपुते या पाच ठिकाणी नव्याने नगरपंचायती होण्यासंदर्भातील शासन अध्यादेश निघाला आहे. पुढील टप्प्यात त्या नगरपंचायतींसह मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची (महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका) निवडणूक होणार आहे. त्यामुळे सोलापूर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. दरम्यान, सोलापूर विधान परिषदेसाठी 492 मतदार असून त्यात नव्याने होणाऱ्या नगरपंचायतींच्या सदस्यांची वाढ होणार आहे.

विधान परिषदेसाठी एकूण मतदारांच्या किमान 75 टक्‍के मतदार असणे आवश्‍यक आहे. परंतु, नव्याने होणाऱ्या नगरपंचायती व मुदत संपलेल्या नगरपालिका, नगरपरिषदांमुळे तेवढे मतदार सद्य:स्थितीत अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सोलापूर विधान परिषदेसाठी पुढील टप्प्यात निवडणूक होईल.

- भारत वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

भाजपची पंचाईत! सोलापूर विधान परिषदेची मार्चनंतर निवडणूक
शेतकऱ्यांना 'या' योजनेतून मिळणार वीजबिलात 50 टक्‍के माफी!

...तर सगळेच नवीन असतील मतदार

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे मोहोळ, माळशिरससह नव्याने होणाऱ्या वैराग, अनगर, महाळुंग, वेळापूर, नातेपुते या पाच नगरपंचायतींचीही निवडणूक त्याच दरम्यान लागेल, असा अंदाज आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी बहुतेक मतदार नवीन असतील, असे बोलले जात आहे. तत्पूर्वी, या टप्प्यात निवडणूक झाल्यास आपणच विजयी होऊ, असे संख्याबळावर बोलणाऱ्या भाजपची कोंडी झाली आहे. सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रशांत परिचारक यांचे नाव निश्‍चित झाले, परंतु संख्याबळ कमी असल्याने राष्ट्रवादीकडून कोणीच इच्छूक नव्हते. आता निवडणूक पुढील टप्प्यात होणार असल्याने भाजपला ताण काढावा लागणार आहे. दरम्यान, निवडणूक पुढे गेल्याच्या निर्णयावर भाजपची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com