esakal | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म! लहान भावानेच पळविले मोठ्या भावाच्या मुलीला
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म!

लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीसोबत दुष्कर्म केल्याची घटना सोलापुरात घडली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीसोबत दुष्कर्म (Crime) केल्याची घटना सोलापुरात (Solapur Crime) घडली आहे. अभिषेक खंडू सर्वगोड (रा. नंदूर, ता. दक्षिण सोलापूर) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत (Jodbhavi Peth Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. त्या अल्पवयीन मुलीला अभिषेक या तरुणाने लग्न करतो, असे आमिष दाखवून अत्याचार केला. हा प्रकार ऑगस्ट 2021 मध्ये घडला असून, मुलाने विवाहाला नकार दिल्याने त्या मुलीने थेट पोलिसांत धाव घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत.

हेही वाचा: उपासमारीला कंटाळून 'ती'चा आत्महत्येचा प्रयत्न! पण...

लहान भावानेच पळविले मोठ्या भावाच्या मुलीला

मागील भांडणाचा राग मनात धरून सावत्र भावाने मोठ्या भावाच्या मुलीला पळवून नेल्याची घटना सोलापुरात घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्या सावत्र भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अकरावीचे शिक्षण घेण्यासाठी ती मुलगी सध्या मामाच्या घरी राहायला होती. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या भावाने मागील भांडणातून मुलीला मामाच्या घरातून पळवून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

सुनेला घरात न घेतल्याने पतीसह सासरच्यांना मारहाण

सुनेला घरात न घेतल्याने पतीला व त्याच्या घरातील लोकांना विटा फेकून व हाताने मारहाण केल्याची घटना सागर चौक परिसरात घडली. या प्रकरणी इरफान मुर्तज शेरदी यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार उमर हारूण रशीद कोतवाल, मुजमिल भडकल, मुनेरा हसन रशीद कोतवाल आणि उस्मान मकबुल कोतवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, फिर्यादीच्या सुनेचे काका हे सुनेला घेऊन त्यांच्या सासरी आले. त्यावेळी फिर्यादीच्या मुलाने, तू कशाला आलीस, तुला जमातीचे लोक सोडणार होते, अशी विचारणा केली. त्यानंतर सुनेने तिच्या काकास फोन करून हे लोक मला घरात घेत नाहीत, असे सांगितले. त्यावेळी त्या सर्वांनी मिळून फिर्यादीच्या मुलास मारहाण केली. भांडण सोडवायला आलेल्या फिर्यादीच्या वडिलांना वीट लागली आणि डोक्‍यास जखम झाली. विटा मारून दरवाजा तोडला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.

हेही वाचा: कोरोनाला त्याने हरविले, मात्र आता कसरत दवाखान्याच्या बिलासाठी!

रामवाडी आरोग्य केंद्रातून संगणक सेटची चोरी

महापालिकेच्या रामवाडी नागरी आरोग्य केंद्रात 8 सप्टेंबरच्या रात्री साडेसात ते 9 सप्टेंबरच्या सकाळी साडेपाच या वेळेत चोरी झाली आहे. स्टाफ नर्स ड्यूटी संपवून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ड्यूटीवर आलेल्यांना नागरी आरोग्य केंद्राचे कुलूप उचकटल्याचे दिसले. केंद्रातून चोरट्याने संगणक सेट (मॉनिटर, माऊस, की-बोर्ड, सीपीयू) चोरून नेला. तसेच महागड्या कंपनीचे एसीचे आउटडोअर युनिटही लंपास केल्याचे आढळले. या प्रकरणी कुमार जाधव यांनी सलगर वस्ती पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. परंतु, महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये सीसीटीव्ही का नाहीत, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

loading image
go to top