
Police seize ₹35 lakh material in gambling den raid at Amrapur, Kadgaon taluka.
Sakal
कडेगाव : अमरापूर (ता. कडेगाव) येथे जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. त्यामध्ये तब्बल २७ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३५ लाख ९४ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.