

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाचे आवाजासंदर्भातील आदेश पायदळी तुडविणाऱ्या मंडळांवर पोलिस कारवाईसाठी पुढे सरसावतात. पण, लगेचच कोणीतरी आमदार, मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना कॉल येतो आणि कारवाई थांबते. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर आमचे पोलिस एका तासात डीजेमुक्त सोलापूर करतील, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ''सकाळ''कडे व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील डीजेवर पोलिसांनी पुण्यात जाऊन कारवाई केली तेंव्हाही दोन विद्यमान आणि एक माजी मंत्र्यांनी अति वरिष्ठ कार्यालयातून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. यपूर्वीही पोलिसांना वारंवार असे अनुभव आल्याने त्यांनीच आता कानात बोळा घातला आहे.