

Solapur District Politics Intensify as Group Registration Gains Momentum
sakal
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माळशिरसमधून विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी केली आहे. गटनेतेपदी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांची निवड झाली. उपगटनेते म्हणून गौतम माने यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य निवडण्यासाठी राजपत्र प्रसिद्ध झाले. या निवडीत गटनेत्याच्या शिफारशीला महत्त्व असल्याने गटनोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली. या मुदतवाढीत मोहिते-पाटील गटाच्या पाच सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी केली आहे.