बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदारांची राजन पाटलांना वॉर्निंग

Rajan Patil: अनगरमध्ये नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्यासह समर्थकांनी मोठा जल्लोष केला. या जल्लोषावेळी राजन पाटील यांच्या मुलाने अजित पवार यांना थेट आव्हान दिलं होतं.
Ajit Pawar

Ajit Pawar Camp Warns Rajan Patil After His Son’s Public Challenge

Esakal

Updated on

Ajit Pawar: सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीत भाजपच्या प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. पण सूचकाची सही नसल्यानं त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आलाय. यामुळे बिनविरोधची परंपरा कायम राहिली. यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्यासह समर्थकांनी जल्लोष साजरा केला. यात राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जल्लोषावेळी थेट अजित पवार यांचं नाव घेत अजित पवार, सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही असं म्हटलं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट प्रत्युत्तर दिलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com