Ranjitsinh Nimbalkar: मोहिते एकटे लढले असते, तर चिंध्या झाल्या असत्या: रणजितसिंह निंबाळकर; भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा
BJP’s Power Show in Modnimb: बैठक जरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची असली तरी पक्षाबाहेरील संजय पाटील भीमानगरकर यांनीच भाजप कार्यकर्त्यांची खदखद माजी खासदारांसमोर बोलून दाखवली. माढा पश्चिमच्या अध्यक्षपदाचा तिढा अजून सुटला नाही.
मोडनिंब : पक्षाचा कार्यकर्ता हा रामभाऊ सातपुते सारखा असावा. लढाई नेहमी मोठ्यांशी करावी. मोहिते-पाटील एकटे लढले असते तर रामभाऊसमोर त्यांच्या चिंध्या झाल्या असत्या, अशी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.