पाच लाख रुपयांच्या डाळिंबाची शेतातूनच चोरी! वाडीकुरोलीतील घटना

पाच लाख रुपयांच्या डाळिंबाची शेतातूनच चोरी! वाडीकुरोली गावातील घटना
पाच लाख रुपयांच्या डाळिंबाची शेतातूनच चोरी! वाडीकुरोली गावातील घटना
पाच लाख रुपयांच्या डाळिंबाची शेतातूनच चोरी! वाडीकुरोली गावातील घटनाCanva
Updated on
Summary

काढणीस आलेल्या भगवा जातीच्या चार टन डाळिंबाची रातोरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : काढणीस आलेल्या भगवा जातीच्या चार टन डाळिंबाची (Pomegranate) रातोरात अज्ञात चोरट्यांनी चोरी (Theft) केली आहे. ही घटना पंढरपूर (Pandharpur) तालुक्‍यातील वाडीकुरोली (Wadikuroli) येथील नितीन काळे यांच्या शेतात घडली आहे. नितीन काळे यांची तीन एकर डाळिंब बाग आहे. सध्या ती काढणीस आलेली आहे. डाळिंबाला बाजारात प्रती किलो 120 रुपये असा चांगला भाव मिळत आहे. हीच नामी संधी चोरट्यांनी साधून काढणीस आलेले चार ते पाच टन डाळिंब रातोरात चोरून नेले आहे. यामुळे नितीन काळे या शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पाच लाख रुपयांच्या डाळिंबाची शेतातूनच चोरी! वाडीकुरोली गावातील घटना
लपवला जातोय कारभार! कासेगाव ग्रामपंचायतविरोधात महिला सदस्याची तक्रार

नितीन काळे हे या भागात कष्टाळू शेतकरी तर म्हणून ओळखले जातात. यावर्षी त्यांनी अत्यंत कष्टाने डाळिंबाचे पीक जोपासले होते. बागेसाठी त्यांनी तीन लाख रुपयांचा खर्च केला होता. डाळिंबाला कधी चांगला तर कधी पडेल दर मिळत असतो. कधी उत्पादन चांगले येते तर कधी मर, तेल्या यांसारख्या रोगाला डाळिंब पिकाचे नुकसान होते. तरीही शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे डाळिंबाचे पीक घेण्यास प्राधान्य देतात. त्यासाठी त्याची योग्य निगा राखतात. नितीन काळे यांनीही भगवा जातीच्या डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. झाडांना चांगली फळे आली आहेत. येत्या दोन - तीन दिवसांत डाळिंब विक्रीसाठी पाठवले जाणार होते. अशातच चोरट्यांनी सुमारे चार ते पाच टन डाळिंबावर हात साफ केला आहे. त्यामुळे शेतकरी नितीन काळे यांची मोठे नुकसान झाले आहे.

पाच लाख रुपयांच्या डाळिंबाची शेतातूनच चोरी! वाडीकुरोली गावातील घटना
महिलेवर खुनी हल्ला करणारा संशयित नऊ दिवसांनी पोलिसांच्या जाळ्यात!

या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात शेतकरी नितीन काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. मागील काही दिवसांपासून डाळिंब चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांची चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनीही या चोरी प्रकरणाची चौकशी करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com