

Pondhawadi’s Rupali Salve, who donated her kidney to save husband Sanjay’s life despite opposition from both families
Sakal
करमाळा : आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी पत्नीने स्वतःची किडनी नवऱ्याला देण्याचा निर्णय घेतला. पोंधवडी (ता. करमाळा) येथील संजय साळवे (वय ३४) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे पत्नी रूपाली हिने आई-वडिलांचा विरोध झुगारून पतीला किडनी देण्याचा निर्णय घेतला आणि पतीला जीवदान दिले आहे.