Solapur News : ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत 9 हजार तरुणांना रोजगाराची संधी

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजना सुरू; जिल्ह्यात २४ केंद्रे
pramod mahajan rural skill development scheme 9 thousand youth got job solapur
pramod mahajan rural skill development scheme 9 thousand youth got job solapurSakal

सोलापूर : प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत गावोगावच्या तरुणांना (१५ ते ४५ वयोगट) मोफत प्रशिक्षणानंतर रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील २४ केंद्रांवर पुढील तीन वर्षांत साधारणतः नऊ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील बीबी दारफळ, नान्नज (ता. उत्तर सोलापूर), कुंभारी व मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर), करकंब, कासेगाव, टाकळी (ता. पंढरपूर), महुद बु. (ता. सांगोला), नागणसूर, जेऊर (ता. अक्कलकोट), जेऊर (ता. करमाळा), माळीनगर, यशवंत नगर (ता. माळशिरस), संत दामाजी नगर, भोसे (ता. मंगळवेढा),

कुरूल, पेनूर (ता. मोहोळ) या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली आहेत. त्या प्रत्येक केंद्रावर दोन सत्रात प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांना (१५ ते ४५ वयोगट) विविध प्रकारचे कौशल्य विकासासंबंधीच्या कोर्सवर प्रशिक्षण दिले जात आहे.

दरम्यान, वांगी (ता. करमाळा), खंडाळी (ता. माळशिरस), मळेगाव, पांगरी (ता. बार्शी), टेंभुर्णी व मोडनिंब (ता. माढा) या ठिकाणची केंद्रे काही दिवसांत सुरू होणार आहेत.

प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजना अद्याप कागदावर

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर महिन्यात केली. त्यातून सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपारिक कारागीर,

सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीर, यांना प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी सवलतीत कर्ज मिळणार आहे. परंतु, ही योजना अद्याप कागदावरच असल्याची वस्तुस्थिती आहे.

प्रशिक्षण संस्थांद्वारे मिळणार रोजगार

ग्रामीण कौशल्य विकास सोसायटीने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत (Pramod Mahajan Grameen Kaushalya Vikas Yojana) गावोगावच्या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांची निवड केली आहे. सोलापूर जिल्ह्यात रविकिरण व राईट्‌स एज्युकेशन या संस्थांची निवड झाली आहे.

काही कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांना या संस्थांच्या माध्यमातूनच विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळवून दिली जाणार आहे. तशा प्रकारचा करार या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. त्यासाठी जिल्हाभरात २४ केंद्रे असून विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळेल. प्रशिक्षणानंतर हमखास रोजगार मिळणार आहे.

- हणुमंतराव नलावडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com