Praniti Shinde : लोकांचे काम करण्याचा आनंद मंत्रिपदात नाही

आमदार शिंदे; रोजंदारांना कायम नियुक्ती आदेश प्रदान
Praniti Shinde
Praniti Shindesakal

सोलापूर : जनतेच्या कामासाठी मी सोलापुरात थांबले. मला लोकांसाठी काम करायचं होतं. अन्यथा उच्च न्यायालयात वकिली केली असती. लोकांचे काम करण्याचा आनंद मंत्रिपदात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला तर रान पेटवू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला.

महापालिकेत २५ ते ३५ वर्षे रोजंदारी कामगार म्हणून सेवा बजावलेल्या १३१ कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासन दरबारी झाला. महापालिकेच्या आवारात त्या १३१ रोजंदारी कामगारांना कायम नियुक्ती आदेश आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार शिंदे बोलत होत्या. याप्रसंगी सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत, संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव, माजी नगरसेवक चेतन नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामान्य जनतेचा आवाज संसदेत पोचला पाहिजे. काम किया तो डरना क्या! मला आव्हानात्मक काम करायला आवडते, असेही आमदार शिंदे म्हणाल्या.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, कामगार नेते जनार्दन शिंदे, सचिव चांगदेव सोनवणे, बाली मंडेपू, अजय क्षीरसागर, अनिल जगझाप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत शिरसट यांनी आभार मानले.

प्रत्येक कामाला शासनाचे  मार्गदर्शन नको’

महापालिका आयुक्त हे चांगले काम करीत असले तरी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शनासाठी प्रस्ताव पाठवू नये. तुम्हाला कामाची माहिती असताना वेळ घालवू नका. शासन पुन्हा प्रस्ताव महापालिकेकडे पाठविते. हा खेळ नाही. जिवाभावाचे प्रश्न असतात. संवेदनशीलता दाखवा. माझेही काही प्रस्ताव मार्गदर्शनासाठी पाठवले आहेत. तातडीने कामे मार्गी लावावीत, अशी सूचना आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com