
Former Solapur health officer’s statement about pressure in medical waste tender process triggers political and administrative uproar.
Sakal
-प्रमिला चोरगी
सोलापूर : जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी दीड वर्षांपूर्वी नियुक्त केलेल्या एस. एस. सर्व्हिसेस कंपनीच्या विरोधात आलेल्या तक्रारीवरून शासनाने अहवाल मागविला आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी निविदा प्रक्रियेत सहभागी निविदाधारकांच्या कागदपत्रांची छाननी करण्यापासून ते पात्र निविदाधारकाला कामाचा आदेश देण्यापर्यंतची कार्यवाही आपण केली आहे. अत्यंत दबावाच्या वातावरणात ही प्रक्रिया केल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.