सोलापूर : नाष्टा करुन पळालेल्या 'कैद्याने' काढला, कारागृह 'शिपायांचा' घाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prisoner escapes
सोलापूर : नाष्टा करुन पळालेल्या 'कैद्याने' काढला, कारागृह 'शिपायांचा' घाम

सोलापूर : नाष्टा करुन पळालेल्या 'कैद्याने' काढला, कारागृह 'शिपायांचा' घाम

सोलापूर : येथील मध्यवर्ती कारागृहाशेजारील तात्पुरत्या कारागृहातील (prison)कैदी (prisoner) रज्जाक गफुर शेख याने तुरुंग कर्मचाऱ्यांचा घाम काढला. चहा, नाष्टा झाल्यानंतर वाहनात भांडी भरताना तो अचानक तुरुंगातून पळाला. शेवटपर्यंत पाठलाग करून त्याला बेगम पेठेत पकडले आणि पुन्हा कारागृहात आणले. त्याच्याविरुध्द जेलरोड पोलिसांत (Jail Road Police Chowky)गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: नाना पटोलेंना अटक करा, गडकरी आक्रमक

घटनेची हकीकत अशी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तुरुंगातील कैद्यांना त्याची बाधा होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती कारागृहालगत सुरु असलेल्या नवीन इमारतीच्या अपूर्ण बांधकामात कैद्यांसाठी तात्पुरते कारागृह उभारले आहे. नेहमीप्रमाणे तेथील कैद्यांसाठी रविवारी (ता. 16) सकाळी सातच्या सुमारास चहा, नाष्टा घेऊन शासकीय वाहन त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी वाहनातील भांडी काढण्यासाठी रज्जाक शेख याला बाहेर काढले. त्याने वाहनातील भांडी बाहेर काढून सर्वांना चहा, नाष्टा वाटप केला आणि स्वत:ही नाष्टा केला. त्यानंतर सर्व भांडी वाहनात ठेवताना अचानक त्याचा विचार बदलला आणि तो कारागृहातून जोरात बाहेरील दिशेने पळू लागला. कारागृहाच्या उघड्या फाटकातून तो पुढे शासकीय निवासस्थानाच्या कॉलनीतून बेगम पेठेत घुसला. परंतु, वाहनचालक कारागृह शिपाई दत्तू शिंदे यांनी वाहनातून तर सुभेदार शंकर लष्करे यांनी धावत त्याचा पाठलाग सुरु ठेवला. शेवटी त्याला बेगम पेठेत पकडले आणि त्या शासकीय वाहनातून पुन्हा कारागृहात आणले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे हे करीत आहेत.

हेही वाचा: प्रजासत्ताक दिनी PM मोदींना धोका, सुरक्षा यंत्रणांना 'हायअलर्ट'

महिन्यापूर्वीच दाखल झाला कारागृहात

सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्राणघात हल्ला केल्याच्या गुन्ह्यात रज्जाक शेख याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्याची रवानगी पुण्यातील येरवाडा कारागृहात केली होती, परंतु कोरोनामुळे मागील महिन्यापासून त्याची रवानगी सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात केली होती. संधी साधून तो पळून जात होता, परंतु त्याला तुरुंग कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडला. दरम्यान, दीड कोटींच्या निधीअभावी कारागृहाच्या नवीन इमारतीचे काम रखडले असून केंद्र सरकार पुरस्कृत योजनेतून तो निधी मिळणार आहे.

Web Title: Prisoner Escaped After Breakfast Took Out Sweat Of The Prison Soldiers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..