Shivajirao Sawant: राजीनाम्याच्या पंधरा दिवसांनंतरही विचारणा नाही: प्रा. शिवाजीराव सावंत; दोन दिवसांत बाहेर पडण्याबाबत निर्णय घेणार
Prof. Shivajirao Sawant Awaits Action: माझ्याच तालुक्यात जर मला न विचारात घेता तालुकाप्रमुख नेमला जात असेल तर पक्षाची वागणूक स्वाभिमानाला ठेच पोचविणारी आहे. याबाबत स्वत: पक्षाकडे तक्रार केली. मात्र हालचाली शून्य झाल्या. पदाचा राजीनामा दिला, त्याला पंधरा दिवस झाले.
"Prof. Shivajirao Sawant awaits administrative action 15 days after submitting his resignation, with exit decision expected soon."Sakal
माढा : राजीनामा देऊन पंधरा दिवस होऊनही पक्षाकडून विचारणा झाली नाही. त्यामुळे स्वाभिमान गहाण ठेऊन पक्षात राहण्यात काय अर्थ आहे, अशी संतप्त भावना व्यक्त करत दोन दिवसांत निर्णय घोषित करणार असल्याचे प्रा. शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.