Solapur : परवान्यावरील शस्त्र जवळ बाळगण्यास बंदी, पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांचे आदेश; ६ जूनपर्यंत निर्बंध

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या काळात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शस्त्र परवानाधारकाकडून त्यांच्याकडील शस्त्राचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे.
परवान्यावरील शस्त्र जवळ बाळगण्यास बंदी
परवान्यावरील शस्त्र जवळ बाळगण्यास बंदीSakal

सोलापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या काळात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शस्त्र परवानाधारकाकडून त्यांच्याकडील शस्त्राचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे १६ मार्च ते ६ जून या कालावधीत परवानाधारकांना त्यांच्याकडील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी काढले आहेत.

निवडणूक काळात विशेषत: मतदानाच्या दिवशी किंवा मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीच्या काळात परवान्यांवरील शस्त्र जवळ बाळगून फिरता येणार नाही, असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

सोलापूर शहर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३मधील कलम १४४ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोलिस आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत. १६ मार्चपासून ६ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत छाननी समितीने सवलत दिलेले शस्त्र परवानाधारक वगळता उर्वरित सर्वांनाच शस्त्र जमा करावे लागणार आहे. स्वत:जवळ शस्त्र बाळगून फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होवू शकते.

निवडणुकीसंदर्भातील ठळक बाबी...

  • सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची घेता येईल मदत

  • मिरवणूक सुरू होण्याची वेळ, जागा, सभेचा मार्ग अगोदर निश्चित करावा, पोलिस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी परवानगी घ्यावी

  • मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या कागदावर असाव्यात, त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव, पक्षाचे नाव नसावे

  • मतदारांना पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये, मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये

  • इतर पक्षांचे कार्यकर्ते, नेते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खासगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्यास परवानगी नाही

  • देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा किंवा कोणतेही प्रार्थनास्थळाचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तिपत्रके निवडणुकीच्या प्रचाराची जागा म्हणून वापरता येणार नाही

  • मतदान केंद्रापासून १०० मीटर आत प्रचार करणे, मतदान संपण्याच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे, मतदारांची मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे, अशा भ्रष्ट व निवडणूक अपराध समजल्या जाणणाऱ्या गोष्टींना मनाई

  • प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक सभा, मिरवणुकांमध्येही ध्वनिवर्धकाचा वापर नको, रात्री दहानंतर सभांना परवानगी नाही

  • सकाळी सहा ते रात्री दहानंतर संबंधित प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय ध्वनिवर्धकांचा वापर करता येणार नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com