सांगोला - सांगोल्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीविरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, ही मोजणी त्वरित थांबवावी, अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चिल्लर पैसे आणि कवड्या उधळण्याचा इशारा किसान आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी दिला आहे. सोमवारी (ता. 30) तहसील कार्यालयसमोर कवढ्या व चिल्लर उधळण करीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.