
उपळाई बुद्रूक : भारताची मान उंचावणारी ऐतिहासिक कामगिरी उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील सात वर्षीय शौर्य शिवप्रसाद नकाते याने करून दाखवली आहे. जकार्ता (इंडोनेशिया) येथे नुकत्याच पार पडलेल्या व्ही ३ इंटरनॅशनल इनलाइन स्केट कॉम्पिटिशन २०१५ मध्ये १०० मीटर स्केटिंग शर्यतीत (वयोगट ६ ते ८) त्याने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे.