
सोलापूर: तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने २६ एप्रिल २०२५ रोजी नाशिक व २० जुलै २०२५ रोजी पुणे येथे घेण्यात आलेल्या १४ वर्षे वयोगटाखालील तायक्वांदो स्पर्धेत एसव्हीसीएस हायस्कूल एमआयडीसी येथील वर्षा काटवे हिने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांच्या हस्ते शाल, बुके व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.