Solapur : मागणी आल्यास तत्काळ टँकर द्या; टंचाईच्या उपाययोजनेत आचारसंहितेची नाही अडचण - कुमार आशीर्वाद

टंचाईच्या उपाययोजना राबवताना ग्रामीण व शहरी भागात टँकर सुरू करण्याची मागणी आल्यावर त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्य अधिकारी यांनी सर्व बाबींची पडताळणी करावी.
Provide tankers immediately if needed No hindrance of code of conduct in drought relief measures  Kumar Ashishwad
Provide tankers immediately if needed No hindrance of code of conduct in drought relief measures Kumar Ashishwad Sakal

सोलापूर : टंचाईच्या उपाययोजना राबवताना ग्रामीण व शहरी भागात टँकर सुरू करण्याची मागणी आल्यावर त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्य अधिकारी यांनी सर्व बाबींची पडताळणी करावी.

आवश्‍यक त्या ठिकाणी त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल याबाबत काळजी घ्यावी. पाण्यासाठी टँकर किती सुरू करावेत याबाबत कोणतीही अडचण नाही, परंतु टँकरची मागणी आल्यानंतर त्या ठिकाणी टँकरची किती प्रमाणात आवश्यकता आहे याची खात्री करूनच ते सुरू करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांनी दिल्या आहेत.

नियोजन भवनात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाईन प्रणालीद्वारे जॉईन झाले होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी टंचाईच्या उपाययोजना राबवत असताना यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही ही बाब लक्षात घेऊन टंचाई उपाययोजना अत्यंत परिणामकारकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा.

निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी खरीप अनुदान व दुष्काळाच्या अनुषंगाने तालुका निहाय आढावा घेऊन सूचना दिल्या. खरीप अनुदानाच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी राहिलेले आहे त्यांचे ई केवायसी तात्काळ करून घेण्याबाबत तहसीलदारांना निर्देश दिले.

उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर म्हणाले, टंचाईच्या उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी पालन करावे. सर्व तालुकास्तरीय यंत्रणाशी परस्पर समन्वय ठेवावा व चारा जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

पाणी उपसा रोखण्यासाठी पथक

उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनासाठी पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर नदी काठावरून पाण्याचा उपसा होणार नाही यासाठी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे का याची खात्री करावी. वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत समन्वय ठेवून पाणी उपसा होणार नाही यासाठी पथके नियुक्त करावीत अशी सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com