Eknath Shinde Sena stand on Pune Teachers Constituency election
esakal
पंढरपूर : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला (Dr. B. P. Ronge Pune Teachers Constituency election) आहे. या निर्णयाचा फायदा अपक्ष उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे, बंडखोर सानप यांना मिळणार की राष्ट्रवादीचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना होणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.