

Pune Teachers Constituency
esakal
पंढरपूर : पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर होताच सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आला आहे. सर्वाधिक मतदार सोलापूर जिल्ह्यात आणि भाजपमधील दोन्ही प्रमुख इच्छुकही सोलापूरचेच असल्याने ही निवडणूक सोलापूरमध्येच फिरणार हे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि डॉ. बी.पी. रोंगे या दोघांमध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
आतापर्यंत अपक्ष लढणारे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी यावेळी प्रथमच पक्षाकडून, विशेषतः भाजपकडून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे डॉ. बी.पी. रोंगे हे देखील अनेक महिन्यांपासून भाजपकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून आहेत. दोन्ही उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील असल्याने भाजप श्रेष्ठी कुणाला पसंती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनी देखील पुन्हा दंड थोपटले आहेत. ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत.
मात्र आमदार आसगावकर यांच्या मागील कामकाजाबाबत शिक्षक मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र आहे. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्याने शिक्षक वर्गात त्यांच्याबद्दल असंतोष आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा आसगावकर यांनाच उमेदवारी देणार की शिक्षकांची नाराजी लक्षात घेऊन नव्या दमाचा, नव्या चेहऱ्याला संधी देणार, याकडेही संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत सोलापूर जिल्हा निर्णायक ठरण्याचे प्रमुख कारण म्हणजे मतदार संख्या. पुणे विभागात सर्वाधिक शिक्षक मतदार सोलापूर जिल्ह्यात आहेत.एकूण 52,490 मतदारांपैकी एकट्या सोलापूर जिल्ह्यात 26% मतदार आहेत. जो उमेदवार सोलापूर जिल्ह्यात आघाडी घेईल, तोच विधान परिषदेवर जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
- सोलापूर - 13480 (सर्वाधिक)
- पुणे - 12276
- कोल्हापूर - 10399
- सातारा - 9080
- सांगली - 7255
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.