

Yuva Sena President Purvesh Sarnaik addressing youth workers in Solapur, urging leadership to empower young party members.
Sakal
सोलापूर : शिवसेनेची संपूर्ण राज्यात जोरदार घौडदौड सुरू आहे. नागरिकांचा विश्वास शिवसेना पक्षावर वाढत चालला आहे. म्हणूनच धाराशिवमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा करणारे आता महायुतीची भाषा शिवसेनेची ताकद वाढल्यानेच करत आहेत. त्याप्रमाणेच सोलापुरातील युवासैनिकांनी ज्येष्ठ शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून सोलापूरला शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला बनवा, अशा सूचना शिवसेना युवासेनेचे प्रदेशाध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केल्या.