Solapur : सांगोल्यात दशकानंतर प्रथमच अतिवृष्टी ; उभी पिके झाली आडवी

तालुक्यात आतापर्यंत 568.7 मिलिमीटर झाला पाऊस
Solapur
SolapurSakal

सांगोला : सांगोला तालुक्यात बुधवारी रात्री मुसळधार झाला. दुष्काळी भाग असणाऱ्या तालुक्याला परतीच्या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांसह जनावरांचे हाल झाले असुन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक गावांमध्ये पूल पाण्याखाली गेल्याने रस्ते बंद झाले आहेत. तरंगेवाडी येथे वीज पडून जर्सी ठार झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 568.7 मिलिमीटर व 105.2 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये संगेवाडी मंडलमध्ये सर्वाधिक 169.1 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

खरिपातील पिकांच्या काढण्या अन् रब्बी पेरण्या केलेल्या ठिकाणी हा पाऊस नुकसानीचा ठरला आहे. या पावसामुळे नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक गावांचे पुल पाण्याखाली गेल्याने काही काळ रस्ते ही बंद पडले होते. जवळा-डिकसळ मार्गावरील पूल तुटला आहे. घेरडी गावाजवळच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला होता. घेरडी-जवळा, घेरडी-पारे, डिकसळ-पारे रस्ताही बंद झाला होता.

यंदाच्या दहाव्या चित्रा नक्षत्राने अक्षरशः दैना उडविली आहे. चित्रातील हा पाऊस नुकसानकारक ठरीत आहे. सांगोला तालुक्यात दशकानंतर अतिवृष्टी होत आहे. तीही नुकसानीची ठरीत आहे. याच वर्षी पावसाची हमखास नक्षत्रे कोरडी गेली. पण परतीच्या या पाऊसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळित आहे. सलग आठ-आठ दिवस हा पाऊस तालुक्यात कोसळला आहे. अजूनही हा नुकसानीचा पाऊस सुरूच आहे. आज पहाटेच्या सुमारास तरंगेवाडी येथे वीज कोसळून सव्वा लाखाची जर्सी गायी मृत्युमुखी पडली आहे.

याच वर्षी मृग, आर्द्रा, पुनवर्स, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा ही नक्षत्रे थोडाच पाऊस देवून गेली. पण 27 सप्टेंबर रोजी निघालेल्या हस्त नक्षत्रापासून या पाऊसाचा जोर पहावयास मिळालेला आहे. आता चित्राही विचित्र ठरीत आहे. याच दहाव्या नक्षत्राने सांगोला तालुक्यात दैना उडविली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची उभी पिके पाण्यातच आडवी झाली आहेत. ओडे, नाले, ताली, बंधारे, विहिरी, तलाव ओसांडून वाहू लागले आहेत. अनेकांच्या जमिनींना पाणीच लागले आहे. 

चौकट - मंडळनिहाय आजपर्यंत झालेला पाऊस (मिमी मध्ये)

मंडळाचे नाव  - एकूण पाऊस - टक्केवारी

सांगोला -  510 - 94.5

शिवणे - 472.0 - 87.3

जवळा - 599.5 - 110.9

हातिद - 529.7 - 98.0

सोनंद - 629.7 - 115.4

महुद - 429.5 - 79.4

कोळा - 600.0 - 111.0

नाझरा - 436.4 - 80.7

संंगेवाडी - 914 - 169.1

एकूण -  568.7 - 105.2

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com