
Flood Fury in Solapur: Farms in Donagav Submerged as Rains Continue
Sakal
उ.सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना खोऱ्यातील पूरपरिस्थिती बुधवारी आणखीनच गंभीर झाली. मंगळवारी मध्यरात्रीपासून पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पात्रापासून दूरपर्यंत पाणी पसरले. नदीकाठसोबत नदीपासून लांब असलेल्या डोणगावलाही पुराच्या पाण्याचा फटका बसला. पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्तांना काही अंशी दिलासा मिळाला.