esakal | माऊलींच्या चोपदारांची अंतरंगवारी! आळंदी ते पंढरपूर प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

माऊलींच्या चोपदारांची अंतरंगवारी! आळंदी ते पंढरपूर प्रवास

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ व रामभाऊ चोपदार या दोन बंधुंनी आळंदी ते पंढरपूर असा प्रवास केला.

माऊलींच्या चोपदारांची अंतरंगवारी! आळंदी ते पंढरपूर प्रवास

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचा (Shri Sant Dnyaneshwar Maharaj) पालखी सोहळा (Palkhi ceremony) म्हणजे फक्त पायी वाटचाल नसून वारीच्या (Wari) वाटेवरील प्रत्येक गावात शेकडो वर्षांची व अनेक पिढ्यांची नाती जपलेली आहेत. हा ऋणानुबंध असलेल्या कुटुंबाची भेट व्हावी, या करिता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ व रामभाऊ चोपदार (Chopdar) या दोन बंधुंनी आळंदी ते पंढरपूर (Alandi to Pandharpur)असा प्रवास केला. प्रत्येक मुक्कामांच्या ठिकाणी एक एक किलोमीटर चालत माऊलींच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन दर्शन व आरती करून काया वाचा मनाने अंतरंगवारी पूर्ण केली.

हेही वाचा: दहिवडी-नातेपुते मार्गावर मोटारसायकल चोरट्यांना शिताफीने अटक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष पायी पालखी निघालेली नाही. जसा माऊलींचा विरह वारकऱ्यांना आहे. तसाच विरह वारीच्या वाटेवरील प्रत्येक गावाला आहे. या गावांची, गावकऱ्यांची भेट घडावी, असे राजाभाऊ व रामभाऊ चोपदार यांनी सांगितले. वारीची परंपरा शेकडो वर्षाची आहे. या प्रत्येक गावात वारकऱ्यांची हक्काची घरी आहेत. या घरांमध्ये रक्तांच्या नात्यापेक्षा त्यांची जिवलग माणसे आहेत. दरवर्षी मुक्कामाच्या दिवशी या लोकांची भेट घेणे हा अलिखित नियम असतो. मात्र, कोरोनामुळे गेली दोन वर्ष सोहळा न निघाल्यामुळे या सर्वांची भेट राहिली होती. अनेकांचे फोन यायचे.

हेही वाचा: जिल्ह्यातील महत्त्वाच्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडी निश्‍चित !

यावर्षी पालखी निघेल असे वाटत होते. मात्र, कोरोनामुळे यंदाही माऊलींच्या पालखीसह इतर सर्व संतांच्या पायी वारीला परवानगी मिळालेली नाही. वारकरी जसे पायी वारीसाठी व्याकुळ असतात. तसेच वारीच्या वाटेवरील प्रत्येक गावात माऊलींचे आगमन म्हणजे एक मोठा आनंद सोहळा असतो. प्रत्येकजण माऊलींची आतुरतेने वाट पाहत असतो. आमचे आजोबा, वडील चोपदार गुरुजी यांचे वाटेवरील प्रत्येक गावात स्नेहाचे संबंध होते. आम्ही दोघे बंधू ते संबंध जोपासत आहोत. आम्हालाही वारीच्या वाटेवरील गावांची ओढ होती. त्यांच्या कुटुंबाची भेट घ्यायची होती. याकरिता आज आळंदीपासून पंढरपूर पर्यंत प्रत्येक गावी भेट देऊन माऊलींच्या मुक्कामाच्या ठिकाणी पूजन व आरती केली.

हेही वाचा: तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील व्यापारी केंद्र असलेल्या नातेपुते ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा लेखाजोखा

वारी नसल्याने लोक कासाविस झाले आहेत. लवकरात लवकर हे कोरोनाचे संकट जावे व पुन्हा त्याच वैभवात पालखी सोहळे पंढरपूरला पोहोचावेत ही पंढरीरायांला प्रार्थना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेत विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या सदस्या ऍड. माधवी निगडे, नरहरी महाराज चौधरी, "आम्ही वारकरी'चे सचिव किरण कामठे हे उपस्थित आहेत. पुणे येथील पालखी विठोबा मंदिर, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर येथे स्नान प्रदक्षणा करून चोपदार बंधूंनी आपली आषाढी वारी काया वाचा मनाने पूर्ण केली.

loading image