

Solapur Controversy Rajan Patil Apologizes for Sons Gesture
Esakal
Ajit Pawar: अनगर नगरपंचायतीत माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील या बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला होता. पण अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी थिटे यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानं तो अर्ज बाद झाला. यानंतर राजन पाटील यांच्यासह समर्थकांनी मोठा जल्लोष केला. या जल्लोषावेळी राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत अजित पवार, नाद करायचा पण अनगरकरांचा नाही असं चॅलेंज दिलं होतं. या विधानावरून आता बाळराजे पाटलांचे वडील राजन पाटील यांनी माफी मागितलीय.