

Sugar Recovery ScamRaju Shetti Targets CM and Sugar Factories
Sakal
पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्यासाठी राज्यातील साखर कारखानदारांना ब्लॅकमेल करत आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता. १३) वाखरी (ता. पंढरपूर) येथे केला. तसेच साखर कारखानदार साखर उताऱ्याची चोरी करून प्रती टन ४०० रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. कारखानदारांची चोरी रोखण्यासाठी यापुढे कारखान्यातून साखर घेऊन बाहेर पडणाऱ्या गाड्या अडवून त्यांची तपासणी करू असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.