Raksha Khadse : क्रीडा संकुलास जास्तीत जास्त निधी देऊ: राज्यमंत्री रक्षा खडसे; विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलाला भेट
Solapur News : देशात सन २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. त्या दृष्टीने केंद्र सरकार खेळाला महत्त्व देत आहे. भविष्यात चांगले खेळाडू घडवायचे असतील तर चांगल्या सोयी सुविधा, चांगले कोच उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
अकलूज : येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिले.