
कुर्डुवाडी : भाजपसोबत आपली युती आहे, परंतु जागा वाटपात रिपाइंला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी माझी परवानगी आहे. जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी कामाला लागा असे आदेश केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंच्या कार्यकर्त्यांना केले.