esakal | उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकपदी रमेश बारसकर
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकपदी रमेश बारसकर

संपुर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करून त्या त्या परिसरातील नेते कार्यकतै यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी सोडविणार असल्याचे बारसकर यांनी सांगितले.

उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकपदी रमेश बारसकर

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा ओबीसी राज्य समन्वयक रमेश नागनाथ बारसकर (Ramesh baraskar) यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या निरीक्षक पदी निवड झाली आहे. तशा आशयाचे लेखी पत्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बारसकर यांना दिले आहे. (Ramesh baraskar has been selected as the Inspector of osmanabad district)

हेही वाचा: 'अँटीबॉडी कॉकटेल'नं कोरोनाचा खात्मा! बार्शीतील डॉक्टराने केला यशस्वी प्रयोग

बारसकर हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांना ग्रामपंचायत ते नगरपरिषदे पर्यंतच्या तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी बारसकर यांना राज्य पातळीवरून वडगाव शेरी, परळी, केज या ठिकाणच्या तर जिल्हा पातळीवरून बार्शी व पदवीधर मतदार संघाच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याची जबाबदारी देण्यात आली होती, ती त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत समन्वय साधला आहे.

हेही वाचा: रुग्णवाहिका वितरणात मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा ठेंगा

सध्या उस्मानाबाद व तुळजापूर या दोन ठिकाणच्या नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादीची काही प्रमाणात पडझड झाली आहे, ती दुरूस्त करून राष्ट्रवादीला नवसंजीवनी देऊन पक्ष बांधणी मजबूत करण्याची जबाबदारी, तसेच या दोन्ही निवडणुकांची ही जबाबदारी बारसकर यांच्यावर पक्षाने दिली आहे. बारसकर यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात होणार आहे. संपुर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करून त्या त्या परिसरातील नेते कार्यकतै यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी सोडविणार असल्याचे बारसकर यांनी सांगितले.(Ramesh nagnath baraskar has been selected as the Inspector of osmanabad district)

loading image