रुग्णवाहिका वितरणात मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा ठेंगा

रुग्णवाहिका वितरणात मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा ठेंगा

मोहोळ (सोलापूर) : शासनाकडून आलेल्या नवीन 9 रुग्णवाहिका वितरणात पुन्हा एकदा मोहोळ शहरातील ग्रामीण रुग्णालयाला ठेंगा मिळाल्याने शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कुठल्या कर्माची फळे शहरवासीयांना भोगावी लागत आहे अशी कुजबूज आता सुरू झाली आहे. याकडे ना लोकप्रतिनिधीचे लक्ष ना अन्य कोणाचे, त्यामुळे कायम संघर्षाचीच भूमिका मोहोळ वासियांना बजावावी लागत आहे. (There are no facilities in mohol rural hospital)

रुग्णवाहिका वितरणात मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा ठेंगा
दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले

मोहोळ शहराच्या मध्यभागी ग्रामीण रुग्णालय आहे. रुग्णालय केवळ नावालाच. ना कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी ना कुठल्या सोयी-सुविधा, त्यामुळे हे रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा आहे. रुग्णालयाचा परिसर बराच अस्वच्छ आहे. रक्तपेढी ही नाही मोहोळ परिसर हा अपघाती परिसर म्हणून ओळखला जातो, मोठा अपघात झाला तर पुढील उपचारासाठी गंभीर जखमी रुग्णाला सोलापूरला हलवावे लागते, तोपर्यंत त्याला जीव गमवावा लागतो अशी अनेक उदाहरणे आहेत.

रुग्णवाहिका वितरणात मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा ठेंगा
भीमा नदीत बुडालेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना 51 हजारांची मदत

गेल्या आठवड्याभरा पूर्वी शासनाकडून आलेल्या नवीन नऊ रुग्णवाहिकांचे तालुकानिहाय वितरण पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. मोहोळ ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकेची मागणी गेल्या तीन ते चार वर्षापासूनची आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला विलगीकरण कक्षात पाठविण्यासाठी ही रुग्णवाहिका नव्हती व आजही नाही. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका मालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. रुग्णवाहिकेची व्यवस्था नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रल्हाद गायकवाड यांनी राजीनामा दिला होता, राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे. त्यावर जिल्हा शल्य चिकित्सक व अन्य वरिष्ठांनी संध्याकाळपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले होते. मात्र बोलाचीच कढी आणी बोलाचाच भात.

रुग्णवाहिका वितरणात मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा ठेंगा
औरंगाबादनंतर सोलापुरात घडला प्रकार! 63 वेळा ट्रान्झेक्‍शन

दरम्यान शहराच्या ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका मिळावी म्हणून ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी आरोग्य मंत्र्यांना पत्र देऊन मागणी ही केली होती त्यांनी मागणीला हिरवा कंदील दाखवला होता, मात्र त्याचाही विचार केला गेला नाही. मोहोळ विधानसभा मतदार संघासाठी कोट्यावधींचा विविध विकास कामांसाठी निधी आणणारे व सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे लोकप्रतिनिधी हतबल झाले काय? कोटीची कोटी उड्डाणं घेणाऱ्या लोक प्रतिनिधीला ग्रामीण रुग्णालयासाठी दोन वर्षात रुग्णवाहिका उपलब्ध करून देता येत नसेल तर शहरासह तालुका वाशीयांचे यापेक्षा दुर्दैव काय असू शकते.

रुग्णवाहिका वितरणात मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा ठेंगा
वीजबिल भरा, अन्यथा कनेक्शन तोडले जाणार

त्या वितरित झालेल्या रुग्णवाहिका जिल्हापरिषदेच्या होत्या, पालक मंत्री व जिल्हा परिषद यांना काय गोंधळ घालायचा तो घालू देत. जिल्हा परिषदेला आपण त्याबाबत फारसे विचारू शकत नाही. मी माझ्या आमदार फंडातून मोहोळ व वडाळा या ग्रामीण रुग्णालयासाठी च्या रुग्णवाहिकाना 54 लाख रुपयांचा निधी दिला आहे. रुग्णवाहिका येण्याची प्रक्रिया सुरू आहे त्या लवकरच येतील.

- यशवंत माने- आमदार, मोहोळ

(There are no facilities in mohol rural hospital)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com