अभिनेता सोनू सुदच्या घरी रंगली स्पर्शरंगची रांगोळी 

sparsh new3.jpg
sparsh new3.jpg
Updated on

सोलापूर: स्पर्शरंग कला परिवारचे विपूल मिरजकर यांनी अभिनेते सोनू सूद यांच्या घरी रांगोळी साकारली. हे पाहण्यासाठी कला क्षेत्रातील मान्यवरांसह इतरांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थलांतरित लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचावेत, यासाठी अभिनेता सोनू सुद याने मोलाचे परिश्रम घेतले. त्याच्या कार्याला सलाम म्हणून सोलापुरातील रांगोळी कलाकार विपूल मिरजकर यांनी स्वत:च्या घरी अभिनेता सोनू सूद याचे स्थलांतरितांना केलेली मदत, याची हुबेहूब मांडणी आपल्या रांगोळीत साकारली. त्यातून त्याने सोनू सुदच्या कार्याचा गौरव केला. त्याने काढलेल्या रांगोळीचा प्रतिकृतीचा फोटो हा सोशल मीडियाद्वारे सोनू सुदपर्यंत पोहोचला. त्यांनी आग्रह केला की माझ्या स्वतःच्या घरी येऊन तशा प्रकारची रांगोळी तू साकारावी. त्याच्या आग्रहामुळे विपूल याने त्याच्या मुंबई येथील राहत्या घरी जाऊन रांगोळी साकारली. सोनू सुद यांनी त्याचे व संपूर्ण स्पर्शरंग कला परिवाराचे कौतुक केले. स्पर्शरंग कला परिवाराचे सागर भारती, रुचिता आडम, अश्विनी चिल्का यांना व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून कौतुक केले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com