ranjit singh nimbalkar meeting with leaders to lok sabha face test
ranjit singh nimbalkar meeting with leaders to lok sabha face testSakal

Madha Lok Sabha Election : रणजितसिंह निंबाळकरांच्या माढ्यात भेटीगाठी

माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी माढ्यामध्ये माजी आमदार धनाजीराव साठे, जिल्हा दूध संघाची माजी संचालक राजेंद्र चवरे यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठी घेऊन राजकीय चाचणी केली.

माढा : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी माढ्यामध्ये माजी आमदार धनाजीराव साठे, जिल्हा दूध संघाची माजी संचालक राजेंद्र चवरे यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठी घेऊन राजकीय चाचणी केली.

खासदार निंबाळकर यांनी माढा तालुक्यातील निमगावमध्ये जाऊन आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माढ्यात जिल्हा दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे यांची भेट घेतली. यावेळी नगरसेविका अनिता चवरे यांनी त्यांचे औक्षण केले.

यावेळी राजेंद्र चवरे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार निंबाळकर हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील व केंद्रीय मंत्रिमंडळात जातील, असे मत व्यक्त केले. त्यानंतर निंबाळकर यांनी काँग्रेसचे माजी आमदार अॅड. धनाजीराव साठे यांच्या निवासस्थानी भेट दिली. नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांनी निंबाळकर यांचे स्वागत केले.

नगरसेवक शहाजी साठे यांच्या घरी जाऊन देखील खासदार निंबाळकर यांनी भेट देत राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमधील रणजितसिंह नाईक - निंबाळकर व अकलूजचे मोहिते पाटील यांच्यातील विसंवादाच्या पार्श्वभूमीवर या गाठीभेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार, लोकसभा प्रमुख जयराज शिंदे, राजेश शिंदे उपस्थित होते.

माढा लोकसभेतील मतदार संख्या

  • पुरुष मतदार - ८,५१,२३३

  • महिला मतदार - ७,८१,६८९

  • इतर मतदार - ५९

  • एकूण मतदार - १९,८१,१५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com