
सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शनिवारी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. त्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगली आहे. मात्र, मोहिते-पाटील यांनी मुलाच्या लग्नाचे निमंत्रणपत्रिका देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.